श्री दत्त बावनी | Datta Bavani Lyrics in Marathi

Datta Bavani Lyrics in Marathi | श्री दत्त बावनी
Print Friendly, PDF & Email
5/5 - (1 vote)

Datta Bavani Lyrics in Marathi | श्री दत्त बावनी ह्या स्तोत्रामध्ये श्री दत्त गुरु यांच्या अवताराचे वर्णन करण्यासाठी बावन्न ओळी लिहिण्यात आल्या आहेत.

श्री दत्त बावन्नीची रचना संत श्री रंग अवधूत महाराज यांनी शके १९९१ माघ शु. प्रतिपदेला सन ४ फेब्रुवारी १९३५ केली होती. या बावन्नीची रचना सईज या गावी केली होती.

ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला Datta Bavani Lyrics in Marathi – श्री दत्त बावनी ही online वाचायला मिळेल.

ह्या पोस्ट ला bookmark करून ठेवा, म्हणजे तुम्हाला हा स्तोत्र रोज online करता येइल.

श्री दत्त बावनी | Datta Bavani Lyrics in Marathi

॥ श्री दत्त बावनी ॥

जय योगीश्वर दत्त दयाळ । तूंच एक जगती प्रतिपाळ ॥१॥

अत्र्यनुसये करूनि निमित्त । प्रगटसि जगतास्तव निश्चित ॥२॥

ब्रह्माऽच्युतशंकर अवतार । शरणांगतासि तूं आधार ॥३॥

अंतर्यामी ब्रह्यस्वरूप । बाह्य गुरु नररूप सुरूप ॥४॥

काखिं अन्नपूर्णा झोळी । शांति कमंडलु करकमळी ॥५॥

कुठें षड्भुजा कोठें चार । अनंत बाहू तूं निर्धार ॥६॥

आलो चरणी बाळ अजाण । दिगंबरा, उठ जाई प्राण ॥७॥

ऐकुनि अर्जुन-भक्ती-साद । प्रसन्न झाला तूं साक्षात् ॥८॥

दिधली ऋद्धी सिद्धी अपार । अंती मोक्ष महापद सार ॥९॥

केला कां तूं आज विलंब? तुजविण मजला ना आलंब ॥१०॥

विष्णुशर्म द्विज तारुनिया । श्राद्धिं जेंविला प्रेममया ॥११॥

जंभे देवा त्रासविले । कृपामृते त्वां हांसविलें ॥१२॥

पसरी माया दितिसुत मूर्त । इंद्रा करवी वधिला तूर्त? ॥१३॥

ऐसी लीला जी जी शर्व । केली, वर्णिल कैसी सर्व? ॥१४॥

घेई आयु सुतार्थी नाम । केला त्यातें तूं निष्काम ॥१५॥

बोधियले यदु परशुराम । साध्य देव प्रह्लाद अकाम ॥१६॥

ऐसी ही तव कृपा अगाध । कां न ऐकसी माझी साद ॥१७॥

धांव अनंता, पाहि न अंत । न करी मध्येच शिशुचा अंत ॥१८॥

पाहुनि द्विजपत्नीकृत स्नेह । झाला सुत तूं निःसंदेह ॥१९॥

स्मर्तृगामी कलितार कृपाळ । जडमुढ रजका तारी दयाळ ॥२०॥

पोटशुळी द्विज तारियला । ब्राह्यणश्रेष्ठी उद्धरिला ॥२१॥

सहाय कां ना दे अजरा? । प्रसन्न नयने देख जरा ॥२२॥

वृक्ष शुष्क तूं पल्लविला । उदास मजविषयी झाला ॥२३॥

वंध्या स्त्रीची सुत-स्वप्नें । फळली झाली गृहरत्नें ॥२४॥

निरसुनि विप्रतनूचे कोड । पुरवी त्याच्या मनिचें कोड ॥२५॥

दोहविली वंध्या महिषी । ब्राह्मण दारिद्र्या हरिसी ॥२६॥

घेवडा भक्षुनि प्रसन्न-क्षेम । दिधला सुवर्ण घट सप्रेम ॥२७॥

ब्राह्मण स्त्रीचा मृत भ्रतार । केला सजीव, तूं आधार ॥२८॥

पिशाच्च पीडा केली दूर । विप्रपुत्र उठवीला शूर ॥२९॥

अंत्यज हस्तें विप्रमदास । हरुनी रक्षिले त्रिविक्रमास ॥३०॥

तंतुक भक्ता क्षणांत एक । दर्शन दिधले शैलीं नेक ॥३१॥

एकत्र वेळी अष्टस्वरूप । झाला अससी, पुन्हां अरूप ॥३२॥

तोषविले निज भक्त सुजात । दाखवुनि प्रचिती साक्षात ॥३३॥

हरला यवननृपाचा कोड । समता ममता तुजला गोड ॥३४॥

राम-कन्हैया रूपधरा । केल्या लीला दिगंबरा! ॥३५॥

शिला तारिल्या, गणिका, व्याध । पशुपक्षी तुज देती साद ॥३६॥

अधमा तारक तव शुभ नाम । गाता किती न होती काम ॥३७॥

आधि-व्याधि-उपाधि-गर्व । टळती भावें भजतां सर्व ॥३८॥

मूठ मंत्र नच लागे जाण । पावे नर स्मरणे निर्वाण ॥३९॥

डाकिण, शाकिण, महिषासूर । भूतें, पिशाच्चें, झिंद, असूर ॥४०॥

पळती मुष्टी आवळुनी । धून-प्रार्थना-परिसोनी ॥४१॥

करुनि धूप गाइल नेमें । दत्तवावनी जो प्रेमें ॥४२॥

साधे त्याला इह परलोक । मनी तयाच्या उरे न शोक ॥४३॥

राहिल सिद्धी दासीपरी । दैन्य आपदा पळत दुरी ॥४४॥

नेमे बावन गुरुवारी । प्रेमे बावन पाठ करी ॥४५॥

यथावकाशे स्मरी सुधी । यम ना दंडे त्यास कधी ॥४६॥

अनेक रूपी हाच अभंग । भजतां नडे न मायारंग ॥४७॥

सहस्र नामें वेष अनेक । दत्त दिगंबर अंती एक ॥४८॥

वंदन तुजला वारंवार । वेद श्वास हें तव निर्धार ॥४९॥

थकला वर्णन करतां शेष । कोण रंक मी बहुकृत वेष ॥५०॥

अनुभवतृप्तीचे उद्गार । ऐकुनी हंसता खाइल मार ॥५१॥

तपसी तत्त्वमसी हा देव । बोला जयजय श्री गुरुदेव ॥५२॥

॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥


श्री दत्त बावनी ही मुळ गुजराती भाषेत रचली गेली होती.

आम्ही आशा करतो की तुम्हाला Datta Bavani Lyrics in Marathi – श्री दत्त बावनी आवडली असेल, जर होय तर कृपया खाली comment करून आपले विचार आवश्य शेअर करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here