श्री स्वामी समर्थ अष्टक | Swami Samarth Ashtak Lyrics

Swami Samarth Ashtak Lyrics
Print Friendly, PDF & Email
5/5 - (2 votes)

नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासाठी श्री स्वामी समर्थ अष्टक – Swami Samarth Ashtak Lyrics प्रस्तुत करत आहोत. जर तुम्हारा स्वामी समर्थ अष्टक म्हणायच असेल तर ह्या पेज वरून तुम्ही म्हणू शकता.

कृपया हा लेख बुकमार्क करून ठेवा म्हणजे तुम्हाला दर वेळेला शोधत बसावे लागणार नाही.

श्री स्वामी समर्थ अष्टक । Swami Samarth Ashtak Lyrics

।। श्री स्वामी समर्थ अष्टक ।।

असें पातकी दीन मीं स्वामी राया ।
पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया ।।
नसे अन्य त्राता जगी या दीनाला ।
समर्थां तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ।।१।।

मला माय न बाप न आप्त बंधू ।
सखा सोयरा सर्व तू दीन बंधू ।।
तुझा मात्र आधार या लेकराला ।
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ।।२।।

नसे शास्त्र विद्या कलादीक काही ।
नसे ज्ञान, वैराग्य ते सर्वथा ही ।।
तुझे लेकरु ही अहंता मनाला ।
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ।।३।।

प्रपंची पुरा बद्ध झालो दयाळा ।
तुझा दास मी ही स्मृती ना मनाला ।।
क्षमेची असे याचना त्वत्पदाला ।
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ।।४।।

मला काम क्रोधाधिकी जागविले ।
म्हणोनी समर्था तुला जागविले ।।
नका दूर लोटू तुझ्या सेवकाला ।
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ।।५।।

नको अंत पाहू त्वरे धाव घेई ।
तुझ्यावीण नाही दुजी श्रेष्ठ आई ।।
अनाथासि आधार तुझा दयाळा ।
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ।।६।।

कधी गोड वाणी न येई मुखाला ।
कधी द्रव्य ना अर्पिले याचकाला ।।
कधी मुर्ती तुझी न ये लोचनाला ।
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ।।७।।

मला एवढी घाल भीक्षा समर्था ।
मुखे नित्य गावी तुझी गुण गाथा ।।
घडो पाद सेवा तुझ्या किंकराला ।
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ।।८।।

।। श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ।।


धन्यवाद कि तुम्ही आमची web site visit केल्या बदल.

आम्ही आशा करतो की तुम्हाला Swami Samarth Ashtak – श्री स्वामी समर्थ अष्टक आवडली असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा.

जर तुम्हाला काही विचार मांडायचे असतील तर ते पण तुम्ही खाली comment मध्ये शेयर करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here