श्री महालक्ष्मी स्तोत्र । Mahalaxmi Stotra in Marathi (2024 Update)

Maha Laxmi Stotra
Print Friendly, PDF & Email
5/5 - (4 votes)

श्री महालक्ष्मी स्तोत्र । Mahalaxmi Stotra in Marathi : नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला जीवनात धन, संपत्ती, सुख आणि समाधान हवे असेल तर श्री महालक्ष्मी देवीला प्रसन्न करून घेणे हा एक सरळतम् उपाय आहे.

पुराणोत्त माहिती नुसार, देवराज इंद्र यांनी महालक्ष्मी स्तोत्रची रचना केली. हे स्तोत्र देवी महालक्ष्मीची प्रार्थना म्हणून म्हंटलं जात.

ह्या स्तोत्र चा भावपूर्ण पाठ करून अमर्यादित धन आणि सुख, समाधान आकर्षित केले जाऊ शकते.

ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला Mahalaxmi Stotra in Marathi lyrics in Marathi – श्री महालक्ष्मी स्तोत्र हा online वाचायला मिळेल.

ह्या page ला bookmark करून ठेवा, म्हणजे तुम्हाला हा स्तोत्र रोज easily ऍक्सेस करता होईल.

श्री महालक्ष्मी स्तोत्र । Mahalaxmi Stotra in Marathi

॥ श्री महालक्ष्मी स्तोत्र ॥

सुंदरे गुणमंदिरे करुणाकरे कमलोद्भवे ।
सिद्धचारण पूजिती जनवंदिते महावैश्णवे ॥१॥

त्राहि हो मज पाही हो मज पाही हो महालक्ष्मी ।
हेमभावन रत्नकोन्दण हे सिंहासन आसनी ॥२॥

एक एक विचित्र माणिक जोडिले मुकुटावरी ।
त्यासि देखुनी लोपला शशि चालला गगनोदरी ॥३॥

कुण्डले श्रवणी रवि शशि मंडळासम वर्तुळे ।
डोलता सुरनायकावरि हालताती चंचले ॥४॥

कंचुकी कुचमंडळावर हार चंपक रुळती ।
पारिजातक शेवती बटमोगरा आणि मालती ॥५॥

पिवळा पट तो कटी तटी वेष्टिल्या बरवे परी ।
सौदामिनीहुनी तेज अधिक ते शोभते उदरावरी ॥६॥

कमुकावर मन्मथे शरसज्जिल्या तैशा निर्या ।
गर्जती पद पंकजी किती नुपुरे आणि घागर्या ॥७॥

इंद्र चंद्र महेंद्र नारद पाद पंकज अर्पिती ।
कुंकुमागुरु कस्तूरी किती आदरे तुज चर्चिती ॥८॥

निर्जळे तुज पूजिता बहु शोभिसी कमलासनी ।
किती हो तुज वर्णु मी मज पाव हो कुलस्वामिनी ॥९॥

कोटि तेहतीस देवतांसवे घेऊनी विन्झणे करी ।
चामरे चिरपल्लवे तुज ढाळिती परमेश्वरी ॥१०॥

नामामृत दे निरंतर याचकाप्रती गिरीसुते ।
जोडुनी कर विनवितो मज पाव हो वरदेवते ॥११॥

संकटी तुज वाचुनी मज कोण रक्षिल अम्बिके ।
कृष्णकेशव प्रार्थतो मज पाव हो जगदम्बिके ॥१२॥

॥ जय जगदम्ब । उदयोस्तु । अंबे उदयोस्तु ॥


रोज सकाळी श्री महालक्ष्मी स्तोत्रचा जप करून अथवा याला ऐकून तुम्ही देवी महालक्ष्मी ऊर्जाक्षेत्रात स्वतःचा समावेश करून घ्या.

आम्ही आशा करतो की तुम्हाला Mahalaxmi Stotra in Marathi – श्री महालक्ष्मी स्तोत्र आवडला असेल, जर होय तर कृपया खाली comment करून तुमचे विचार शेअर करा, आणि ह्या पेज ला तुमच्या मित्रां बरोबर नक्की share करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here