गणपती स्तोत्र | Ganesh Stotra in Marathi (2024 Update)

Ganpati Stotra in Marathi
Print Friendly, PDF & Email
5/5 - (3 votes)

Ganpati Stotra in Marathi | गणपती स्तोत्र हा विग्नहर्ता श्री गणेश बाप्पाचा स्तोत्र आहे. ह्या स्तोत्राचा पाठ करुन संकटाला मात करुन विजय मिळवण्याची शक्ति मिळते.

ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला Ganpati Stotra in Marathi – गणपती स्तोत्र हा online वाचायला मिळेल.

ह्या पोस्ट ला bookmark करून ठेवा, म्हणजे तुम्हाला हा पाठ रोज online करता येइल.

गणपती स्तोत्र संस्कृत | Ganpati Stotra in Sanskrit

॥ गणपती स्तोत्र संस्कृत ॥

प्रणम्यं शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेनित्यमायु:सर्वकामार्थसिध्दये ॥१॥

प्रथमं वक्रतुडं च एकदंत द्वितीयकम् ।
तृतियं कृष्णपिंगात्क्षं गजववत्रं चतुर्थकम् ॥२॥

लंबोदरं पंचम च पष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्ण तथाष्टमम् ॥३॥

नवमं भाल चंद्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजानन् ॥४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसंघ्यंयः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ॥५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मो क्षार्थी लभते गतिम् ॥६॥

जपेद्णपतिस्तोत्रं षडिभर्मासैः फलं लभते ।
संवत्सरेण सिद्धिंच लभते नात्र संशयः ॥७॥

अष्टभ्यो ब्राह्मणे भ्यश्र्च लिखित्वा फलं लभते ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥८॥

॥ इति श्री नारद पुराणे संकष्टनाशनं नाम श्री गणपति स्तोत्रं संपूर्णम् ॥

गणपती स्तोत्र मराठी | Ganpati Stotra in Marathi

॥ गणपती स्तोत्र मराठी ॥

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका ।
भक्तीनें स्मरतो नित्य आयुःकामार्थ साधती ॥१॥

प्रथम नांव वक्रतुंड दुसरें एकदंत ते ।
तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्र ते ॥२॥

पाचवे श्री लंबोदर सहावें विकट नांव ते ।
सातवे विघ्नराजेंद्र आठवे धुम्रवर्ण ते ॥३॥

नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक ।
अकरावे गणपती बारावे श्री गजानन ॥४॥

देवनांवे अशी बारा तीन संध्या म्हणे नर ।
विघ्नभीती नसे त्याला प्रभो ! तू सर्व सिद्धिदे ॥५॥

विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन ।
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गति ॥६॥

जपता गणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ ।
एक वर्ष पुर्ण होतां मिळे सिद्धी न संशय ॥७॥

नारदांनी रचिलेले झाले संपू्र्ण स्तोत्र हें ।
श्रीधराने मराठींत पठण्या अनुवादिले ॥८॥

॥ श्रीगणपती स्तोत्र संपूर्ण ॥


गणपती स्तोत्र हा खुपच शक्तिशाली स्तोत्र असून, ह्याचा नियमित भावपूर्ण पाठ करुन तुम्हाला तुमच्या जीवनात विग्नाचा नाश करण्याची शक्ति मिळेल.

आम्ही आशा करतो की तुम्हाला Ganpati Stotra in Marathi – गणपती स्तोत्र आवडला असेल, जर होय तर कृपया खाली comment करून तुमचे विचार शेअर करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here