Bhimrupi Maharudra Vajra Hanuman Maruti | भीमरूपी महारुद्रा

Bhimrupi Maharudra
Print Friendly, PDF & Email
5/5 - (1 vote)

नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्ट मध्ये आपण Bhimrupi Maharudra – Maruti Stotra बघणार आहोत.

मारुती स्तोत्र हाय खूपच सुप्रसिद्ध असा स्तोत्र आहे जो भगवान मारुती यांच्यावर आधारित आहे.

या स्तोत्राचे पठण केल्याने एक निराळी शक्ती मनामध्ये वास करून राहते. भगवान मारुती यांचे आशीर्वाद लाभून मनातील सारी भीती नष्ट होऊन जाते. मनात कोणत्याही प्रकारची कमजोरी अशी राहत नाही मन बळशाळी आणि तरो ताजा राहतो.

भीमरूपी महारुद्रा | Bhimrupi Maharudra | Maruti Stotra

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती ।
वनारि अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥ १॥

महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें ।
सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका ॥ २॥

दीनानाथा हरीरूपा सुंदरा जगदांतरा ।
पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ॥ ३॥

लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ॥ ४॥

ध्वजांगें उचली बाहो आवेशें लोटला पुढें ।
काळाग्नि काळरुद्राग्नि देखतां कांपती भयें ॥ ५॥

ब्रह्मांडें माइलीं नेणों आंवळे दंतपंगती ।
नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा भ्रकुटी तठिल्या बळें ॥ ६॥

पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं ।
सुवर्णकटिकांसोटी घंटा किंकिणि नागरा ॥ ७॥

ठकारे पर्वताइसा नेटका सडपातळू ।
चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥ ८॥

कोटिच्या कोटि उड्डणें झेपावे उत्तरेकडे ।
मंदाद्रीसारिखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें ॥ ९॥

आणिला मागुती नेला आला गेला मनोगती ।
मनासी टाकिलें मागें गतीसी तूळणा नसे ॥ १०॥

अणूपासोनि ब्रह्मांडायेवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठें मेरुमांदार धाकुटें ॥ ११॥

ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें करूं शके ।
तयासी तुळणा कैंची ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥ १२॥

आरक्त देखिलें डोळां ग्रासिलें सूर्यमंडळा ।
वाढतां वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा ॥ १३॥

धनधान्य पशुवृद्धि पुत्रपौत्र समग्रही ।
पावती रूपविद्यादि स्तोत्रपाठें करूनियां ॥ १४॥

भूतप्रेतसमंधादि रोगव्याधि समस्तही ।
नासती तूटती चिंता आनंदे भीमदर्शनें ॥ १५॥

हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली भली ।
दृढदेहो निःसंदेहो संख्या चंद्रकलागुणें ॥ १६॥

रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासि मंडणू ।
रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोष नासती ॥ १७॥

॥ इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं नाम श्री मारुतिस्तोत्रं सम्पूर्णम् ॥


आम्ही आशा करतो की तुम्हाला Bhimrupi Maharudra | Maruti Stotra आवडला असेल, जर होय तर कृपया खाली comment करून तुमचे विचार शेअर करा.

आपण हा स्तोत्र या ब्लॉग च्या माध्यमातून तुम्हाला दिलेला आहे. या स्तोत्राचा वापर तुम्ही चांगल्या मनाने आणि श्रद्धा भक्ती ठेवून करावा अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here