गजेंद्र मोक्ष स्त्रोत | Gajendra Moksha Stotra in Marathi

gajendra moksha stotra in marathi
Print Friendly, PDF & Email
Rate this post

ह्या पोस्ट मध्ये तुमच्यासाठी गजेंद्र मोक्ष स्त्रोत | Gajendra Moksha Stotra in Marathi online वाचायला सादर करत आहे.

Gajendra Moksha Stotra in Marathi | गजेंद्र मोक्ष स्त्रोत

गजा दे जो मुक्ती त्वरित विभु नक्रासि दमुनी
मुनी ज्याला शास्त्रीं हरि म्हणति त्यालाचि नमुनी
कथा ते संक्षेपें कथिन बरि पक्षींद्र गमना
मनामध्यें ध्यान द्विरदवरदा दुःख शमना ॥१॥

जळीं दांतें नक्र द्विरदपदमांसास्थि उकरी
करी प्राणत्यागी सुमति सुचली तों झडकरी
करी धांवा कीं वो सुलभ वर जो देवनिकरीं
करीं घे अर्पाया कमळ पदपद्यें सुखकरी ॥२॥

नसे ठावा ब्रह्मा नच शिव हरा अथवा श्रीपति हरी
हरी जो तापातें उचलुनि कृपासिंधुलहरी
हरी वाटे काळा करिस विपती मृत्युभुजगा
जगाचा तूं ऐसा धनि कवण तो पाव मज गा ॥३॥

वदे दुःखी तेव्हां म्हणउनि कळे दिवनिकरा
करावा तो मुक्त स्वशरण गमे श्रीप्रियकरा
करीं चक्रें शस्त्र प्रभु उचलि यानीं खगमनीं
मनीं साक्षी तो ये गज जळज घे तो स्वनमनीं ॥४॥

असा मी तो आत्मा त्रिदशनिकरां वंद्य सकळां
कळाया ही ये त्यासह करि तया मुक्त विकळा
कळा प्रेतप्राय स्मरण करि त्यातें न अवधी
वधी नक्रातें त्या अवसरिं कृपाब्धी निरवधी ॥५॥

मृताच्या त्या तोंडामधुनि पद तो हा झडकरी
करी तें वोढे ना प्रभुच करुणा मागुति करी
करीं दोंपायातें सह उचलि यानीं सुखकरी
करींद्रा सारुप्य त्वरितगति दे मुक्ति निकरीं ॥६॥

भुजा चारी पीतांबरधर असी मूर्ति बरवी
रवी जाणों हातीं रथचरण तें दीप्ति मिरवी
गजा एके हातीं जळजयुग दोहीं शुभकरीं
करींद्रा सारुप्य त्वरितगति दे मुक्ति निकरी ॥७॥

स्तवी ब्रह्मा शंभू त्रिदशपति तो मुक्तिहि नवा
नवा भक्तीची हे गति दिधलि ज्याला अभिनवा
न वाटे त्यां सर्वा हरिविण धनी आणिक जगा
जगाया हे भक्ती प्रभुच म्हणती ईश मज गा ॥८॥

पदें तेव्हां सर्वद्विरदवरदा श्रीपति असा
असारीं संसारीं गजगति असी गातचि असा
पहाटे हें गाय प्रतिदिनिंहि माझें चरित रे
तरे दुःखाब्धी तो नपरमपदींहूनि उतरे ॥९॥

गजाची जे मुक्ती क्रमुनि इतरां शक्ति नजनीं
जनीं गाती त्याला फळ परम या विष्णुभजनीं
जनीं ध्वंसस्वामी करि भजक हो गातचि असा
असारीं संसारीं म्हणुनि विनवी वामन असा ॥१०॥


मित्रोंना तुम्हाला गजेंद्र मोक्ष स्त्रोत | Gajendra Moksha Stotra in Marathi जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा.

या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here