श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय पाचवा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 5

Shri Swami Samarth Saptashati Adhyay 5
Print Friendly, PDF & Email
Rate this post

श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय पाचवा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 5: ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला हा अध्याय online वाचायला मिळेल.

Shri Swami Samarth Saptashati Adhyay 5 | श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय पाचवा

श्री गणेशाय नम: |

ऊँ दत्त परब्रह्माय स्वाहा ॥

ब्रह्मनिष्ठा वामन । स्वामी आज्ञे करोन ।
बडोद्यात राहोन । लोककल्याण करिती ते ॥१॥

वृध्दापकाळ आला । देह व्याधिग्रस्त झाला ।
वामनरावांच्या दु:खाला । पारावार राहिना ॥२॥

भक्त सेवा करीत । म्हणोनी मनी दु:खित ।
म्हणती जीणे व्यर्था । लोकांसी त्रास होत असे ॥३॥

मनी विचार करीत । जलात व्हावे समाधिस्थ ।
प्राणायाम कुंभक । साध्य होता केलेला ॥४॥

एके रात्री उठत । समीप सुरसागर असत ।
समाधी घेण्यास उतरत । जलामाजी तेधवा ॥५॥

प्राणायाम करो लागत । नवल वर्तले तेथ ।
प्रकटले स्वामी समर्थ । भक्त रक्षण्या कारणे ॥६॥

स्वामी समर्थ प्रकटत । हातासी त्याच्या धरीत ।
जलाबाहेर ओढीत । देती श्रीमुखात ठेवूनिया ॥७॥

दिला बुक्क्यांचा मार । शिव्या घातल्या भरपूर ।
म्हणती प्रारब्धाचा भार । चुकवू का तू पाहसी ॥८॥

जरी आत्ता चुकविसी । तरी पुढील जन्मात भोगसी ।
म्हणून कधी प्रारब्धासी । चूकवू नये अवधारा ॥९॥

ऐसे सांगोनी तयासी । आणून सोडिले गृहासी ।
दर्शन दिले सर्वांसी । घरातील लोकांना ॥१०॥

आणि झाले गुप्त । ऐसे स्वामी समर्थ ।
तयांचा महिमा अगाध । कोणी कैसा वर्णावा ॥११॥

एक भक्त पाण्यात बुडत आहे
व स्वामी त्याला बाहेर ओढून काढता आहेत.

ते रात्री झोप लागली । वामनाची व्याधी गेली ।
कृपा करिता गुरुमाऊली । अशक्य सांगा काय ते ॥१२॥

वामन होऊनी ठणठणीत । अक्कलकोटी दर्शना येत ।
सर्वां सांगे वृत्तांत । कैसे प्रकटले श्री स्वामी ॥१३॥

एक वृध्द स्त्री पुत्रासहित । होती स्वामी सेवा करीत ।
पुत्र अंधा असत । म्हणोनी सेवा करीत असे ॥१४॥

काही दिवस गेल्यावर । पुसे स्वामींसी उपचार ।
स्वामी करुणासागर । म्हणती पाहा काय ते ॥१५॥

आमुची परीक्षा पाहण्यासी । पाच ब्राह्मण येत असती ।
तेव्हा याच्या नेत्रासी । दृष्टी देऊ आम्ही हो ॥१६॥

असो चार दिवस जाती । पाच पंडित येती ।
म्हणती स्वामींची प्रचिती । पाहावयासी आलो हो ॥१७॥

ऐसे लोकां सांगत । स्वामी समोर बैसत ।
स्वामी उगेची असत । काही न बोलती तयालागी ॥१८॥

ते स्वामींसी म्हणत । सांगा वेद शास्त्रार्थ ।
तुमची कीर्ती महासिध्द । म्हणोनी आम्ही ऐकिली ॥१९॥

श्री स्वामी नवल करीत । अंध मुला जवळ बोलावीत ।
माळ त्याच्या गळा घालीत । कृपा हस्त शिरी ठेविती ॥२०॥

तात्काळ अंधासी दृष्टी येत । स्वामी म्हणती तयाप्रत ।
यांच्या मनातील शास्त्रार्थ । उत्तरासह सांगे तू ॥२१॥

ऐसे ऐकता वचन । मुलगा उभा राहोन ।
सांगे मनातील वचन । वेद वाक्यांसहित जे ॥२२॥

सांगे उपनिषद भागवत । पंडिता मनातील श्लोक।
ब्राह्मण चरण धरीत । श्री स्वामींचे तेधवा ॥२३॥

ऐसा महिमा अगाध । वर्णो न शके शेष वेद ।
तो पुराणपुरुष स्वयंभू । अक्कलकोटी राहिला ॥२४॥

अंधांसी नेत्र देत । मुक्यांसी वाचा देत ।
पांगळ्या चालाया लावत । ऐसा महिमा श्री गुरुंचा ॥२५॥

ऐशा लीला अगाध । करिती स्वामी समर्थ ।
ते दत्तप्रभू साक्षात । प्रज्ञापुरी राहिले ॥२६॥

नारायण भट नामे भक्त । जाई तिरुपती दर्शनार्थ ।
तेथे स्वामी समर्थ । दर्शन देती तयालागी ॥२७॥

अक्कलकोटी येवोन । तो सांगे वर्तमान ।
तिरुपतीस स्वामी दर्शन । झाले म्हणोनी सांगे तो ॥२८॥

भक्त पुसती स्वामींसी । केव्हा गेला तिरुपतीसी ।
स्वामी म्हणती तयासी । गेलो होतो म्हणोनिया ॥२९॥

सर्वा आश्चर्य वाटत । स्वामी सर्वत्र फिरत ।
अक्कलकोटीही असत । नवल वाटे सर्वांते ॥३०॥

तुकोजीराव होळकर । जाती अबू पर्वतावर ।
स्वामी समर्थ गुरुवर । दर्शन देती तयांना ॥३१॥

म्हणे केव्हा आलात । ऐसे पुसे स्वामीप्रत ।
आलो आत्ताच म्हणत । समर्थ स्वामी तयांना ॥३२॥

होळकर येती प्रज्ञापुरात । तेथे लोकांसी सांगत ।
अबू पर्वती भेटत । समर्थ स्वामी म्हणोनिया ॥३३॥

लोक तयांसी म्हणत । स्वामी येथेची असत ।
ऐकोनी विस्मय बहुत । तुकोजीसी वाटला ॥३४॥

ऐसा महिमा अमित । येथे वर्णिला संक्षिप्त ।
श्री स्वामी समर्थ । अगाध महिमा जयाचा ॥३५॥

एक ब्राह्माण गोदावरीच्या तीरावर ध्यान करीत बसला आहे
व समोर ज्योतीमध्ये स्वामी प्रगट झाले आहेत .

बाबा घोलप पंचवटीत । सात्त्विक ब्राह्मण होते राहत ।
यज्ञ दान तप करीत । अहंकार रहित होते ते ॥३६॥

व्हावा ईश्वर साक्षात्कार । ऐसे तळमळे अंतर ।
करिती साधू सत्कार । परि तळमळ जाईना ॥३७॥

एके दिनी ब्राह्ममुहूर्ती । गंगेवरी स्नाना जाती ।
स्नान करोनी काठावरती । जप करीत बैसले ते ॥३८॥

समोर काही अंतरावर । दिसे ज्योत प्रखर ।
हा काय प्रकार । म्हणोनी बाबा पाहती ॥३९॥

ज्योत येई पुढयात । त्यातूनी प्रकटती स्वामी समर्थ ।
प्रखर तेजाने दिपत । डोळे बाबा घोलपांचे ॥४०॥

अजानुबाहू भव्य मूर्ती । किरणे सर्वत्र फाकती ।
दिव्य तेजाने झळकती । नयन त्या यति राजांचे ॥४१॥

घोलप करिती नमस्कार । म्हणती आपण ईश्वर ।
करण्या माझा उध्दार । येथे आपण आलासा ॥४२॥

होय म्हणती स्वामी समर्थ । आलो दर्शन देण्याप्रत ।
तुझ्या तपाचे फळ देत । आहे याची क्षणामाजी ॥४३॥

मी अक्कलकोटी सांप्रत । आहे सदेहाने राहत ।
तू येई दर्शनाप्रत । ऐसे सांगती तयालागी ॥४४॥

ऐसे म्हणोनी गुप्त । होती पाहा स्वामी समर्थ ।
बाबा घोलप विस्मित । झाले पाहा तेधवा ॥४५॥

असो काही दिवसांनंतर । घोलप जाती प्रज्ञापूर ।
पाहता दत्त दिगंबर । समाधी लागे तयांना ॥४६॥

लोकांसी बाबा सांगत । हे असती भगवान दत्त ।
गोदावरी किनारी प्रकटत । दर्शन देण्या मजलागी ॥४७॥

नाशिकात बाबा घोलप । मठ आहे पंचवटीत ।
ऐसे श्री स्वामी समर्थ । अगाध महिमा तयांचा ॥४८॥

लोकोध्दारा कारण । करिती सिध्द निर्माण ।
तो जगत्‍पालक नारायण । जगदोध्दारा कष्टतसे ॥४९॥

तीनशेहून अधिक । निर्माण करिती सिध्द ।
त्याव्दारे जन उध्दरीत । ऐसा महिमा तयांचा ॥५०॥

नृसिंह सरस्वती आळंदीचे । श्रीकृष्ण सरस्वती कोल्हापूरचे ।
रामानंद बीडकर पुण्याचे । समर्थ शिष्य असती हो ॥५१॥

शिर्डीचे साइनाथ । नाशिकचे बाबा घोलप ।
पुण्याचे शंकरनाथ । शिष्य असती समर्थांचे ॥५२॥

अलवणीबुवा भारतीबुवा । कृष्णगिरी रामपुरीबुवा ।
स्वामीसुत स्वामीकुमरबुवा । शिष्य असती समर्थ्यांचे ॥५३॥

दत्तगिरी नामे भक्त । जन्म नृसिंहवाडीत ।
गुरुदर्शना तळमळत । त्यांसी दृष्टात होत असे ॥५४॥

स्वप्नी म्हणती श्री दत्त । मी आहे अक्कलकोटात ।
येवोनी मजला भेट। ऐसे सांगती तयालागी ॥५५॥

दत्तगिरी ये प्रज्ञापुरी । पाहे मूर्ती गोजिरी ।
अजानुबाहू चमत्कारी । पाहुनी वंदन करीतसे ॥५६॥

समाधी दिवस सात । त्यासी लावूनी देत ।
कर्नाटका पाठवीत । लोकोध्दार करावया ॥५७॥

वेंगुर्ल्याचे आनंदनाथ । त्यासी स्वामी सिध्द करीत।
पादुका त्यांसी देत । वेंगुर्ल्यासी पाठाविले ॥५८॥

अलवणीबुवा नामे भक्त । असे बडोद्यात राहत ।
एके दिनी अकस्मात । दिव्य रुपाते पाहतसे ॥५९॥

कटीवरी ठेवूनी हात । स्वामी समोर प्रकटत ।
बुवा राहती पाहत । अजानुबाहू समर्थांते ॥६०॥

करुनी स्वामींसी नमस्कार । स्तुती केली अपार ।
संस्कृतात काव्य सुंदर । करोनी स्तुती करीतसे ॥६१॥

नंतर पुसती तयांसी । आपण कोठील रहिवासी ।
अंतर न पडो चरणांसी । म्हणोनिया पुसतसे ॥६२॥

मी जाणे आपण ईश्वर । परी सदेह कोठे राहणार ।
कृपा करोनी सत्वर । सांगा मजसी दयाघना ॥६३॥

ऐसे प्रश्न संस्कृतात । बुवा समर्थांसी पुसत ।
समर्थ संस्कृत भाषेत । उत्तर देती तयांना ॥६४॥

राहे भक्तांच्या हृदयात । तैसेची सर्व तीर्थात ।
परी सदेह सांप्रत । अक्कलकोटी राहतसे ॥६५॥

इतुके बोलूनी समर्थ । तेथेची पाहा होती गुप्त ।
अलवणीबुवा मनी म्हणत । दत्त नयनी पाहिला ॥६६॥

अलवणीबुवा अक्कलकोटात । कालांतरे येवोनी राहत ।
सर्व भक्ता सांगत । अनुभव दत्तदर्शनाचा ॥६७॥

ऐसे स्वामी समर्थ । शिष्य निर्माण करीत ।
असंख्य शिष्य निर्मित । लोकोध्दारा कारणे ॥६८॥

राहोनिय़ा चराचरात । सद्‍भक्ताते दर्शन देत ।
श्री गुरु स्वामी समर्थ । अपार महिमा तयांचा ॥६९॥

म्हणोनिया दत्तगिरी । श्री गुरुचरित्र विस्तारी ।
दत्त दिगंबर अवतारी । अक्कलकोटी राहिला ॥७०॥


तुम्हाला आमची web site आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना share नक्की करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here