मारुती स्तोत्र मराठी | Maruti Stotra in Marathi PDF (2024 Update)

Maruti Stotra
Print Friendly, PDF & Email
5/5 - (1 vote)

मारुती स्तोत्र Maruti Stotra हा मराठीत लिहिलेला एक बळशाली स्तोत्र आहे.

या स्तोत्राने मारुतीला स्मरण करून त्यांच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व संकटांवर विजय प्राप्त होते.

जीवनात कधीही तुम्हाला भीतीची भावना सतावत असेल तर तुम्ही मारुती स्तोत्र नक्की वाचा, त्याने तुमची भीती नाहीशी होईल आणि तुम्हाला मारुती देवाची शक्ती प्राप्त होईल.

मारुती स्तोत्र | Maruti Stotra in Marathi PDF

।। श्री मारुती स्तोत्र ।।

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती ।
वनारि अंजनीसुता रामदूता प्रभंजना ॥१॥

महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें ।
सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका ॥२॥

दीनानाथा हरीरूपा सुंदरा जगदांतरा ।
पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ॥३॥

लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ॥४॥

ध्वजांगें उचली बाहो आवेशें लोटला पुढें ।
काळाग्नि काळरुद्राग्नि देखतां कांपती भयें ॥५॥

ब्रह्मांडें माइलीं नेणों आंवळे दंतपंगती ।
नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा भ्रकुटी तठिल्या बळें ॥६॥

पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं ।
सुवर्णकटिकांसोटी घंटा किंकिणि नागरा ॥७॥

ठकारे पर्वताइसा नेटका सडपातळू ।
चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥८॥

कोटिच्या कोटि उड्डणें झेपावे उत्तरेकडे ।
मंदाद्रीसारिखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें ॥९॥

आणिला मागुती नेला आला गेला मनोगती ।
मनासी टाकिलें मागें गतीसी तुळणा नसे ॥१०॥

अणुपासोनि ब्रह्मांडायेवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठें मेरुमांदार धाकुटें ॥११॥

ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें करूं शके ।
तयासी तुळणा कैंची ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥१२॥

आरक्त देखिलें डोळां ग्रासिलें सूर्यमंडळा ।
वाढतां वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा ॥१३॥

धनधान्य पशुवृद्धि पुत्रपौत्र समग्रही ।
पावती रूपविद्यादि स्तोत्रपाठें करूनियां ॥१४॥

भूतप्रेतसमंधादि रोगव्याधि समस्तही ।
नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शनें ॥१५॥

हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली भली ।
दृढदेहो निःसंदेहो संख्या चंद्रकलागुणें ॥१६॥

रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासि मंडणू ।
रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोष नासती ॥१७॥


आम्ही आशा करतो की तुम्हाला Maruti Stotra – मारुती स्तोत्र आवडला असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here