काळूबाईची आरती | Kalubaichi Aarti Lyrics

Kalubaichi Aarti Lyrics
Print Friendly, PDF & Email
Rate this post

आज आपल्यासाठी Kalubaichi Aarti Lyrics | काळूबाईची आरती घेऊन आलो आहे.

ही आरती वाचून तुम्ही माता काळुबाई यांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या. तर चला मग आता आरती बघूया.

Kalubaichi Aarti Lyrics | काळूबाईची आरती

जयदेवी जयदेवी काळूबाई पाजळल्या ज्योती
ओवाळू आरती काळूबाई तुझी मूर्ती ।।धृ।।

काळूबाई स्थान तुझं ग मांढर डोंगराशी
वरदहस्त देउनी छाया धरी पामराशी
जयदेवी जयदेवी ।। १ ।।

गोजिर मांगीर बुवा आहे गड राक्षनासी
लाखो भक्त येती आई तुझ्या दर्शनासी
जयदेवी जयदेवी ।। २ ।।

मांढर देवी गाव पवित्र तुझ्या पायथ्याशी
करवंदीची जाळी भोवती डोंगर माथ्याशी
जयदेवी जयदेवी ।। ३ ।।

लिंब नारळ चोळी पातळ मान तू घेसी
पौषी पौर्णिमेला भक्ता दर्शन तू देसी
जयदेवी जयदेवी ।। ४ ।।

चाफ्यावरती नाग डुलतो पोर्णिमेदिवशी
मांढरदेवी माता आई स्वरूप दावीशी
जयदेवी जयदेवी ।। ५ ।।

करता भक्ती तुझ्या द्वारी प्रसन्न तू होशी
विगन टाळून आई इडा पीडा नेशी
जयदेवी जयदेवी ।। ६ ।।


आम्ही आशा करतो की तुम्हाला Kalubaichi Aarti Lyrics | काळूबाईची आरती आवडली असेल, जर होय तर कृपया खाली comment करून तुमचे विचार शेअर करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here