Durge Durgat Bhari Lyrics | दुर्गा देवीची आरती

Durge Durgat Bhari Lyrics
Print Friendly, PDF & Email
5/5 - (1 vote)

ह्या पोस्ट मध्ये तुमच्यासाठी Durge Durgat Bhari Lyrics | दुर्गा देवीची आरती online वाचायला प्रस्तुत करत आहे.

दुर्गादेवी आरती ही खूपच शक्तिशाली अशी आरती आहे.

या आरतीमध्ये खूपच ऊर्जा शक्ती दडलेली आहे . या आरतीचा उच्चार करून आपण आपल्या मनातील आणि शरीरातील व्हायब्रेशन पूर्णपणे बदलू शकतो.

Durge Durgat Bhari Lyrics in Marathi | दुर्गा देवीची आरती

दुर्गे दुर्गटभारी तुजविण संसारी
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी
वारी वारी जन्म मरणांतें वारी
हारी पडलो आता संकट निवारी ॥१॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी
सुरवर ईश्वरदे तारक संजीवनी, जय देवी जय देवी ॥धृ॥

त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसे नाही
चारी श्रमले परंतु न बोलवे काही
साही विवाद करता पडले प्रवाही
ते तू भक्तांलागी पावसि लवलाही ॥२॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी
सुरवर ईश्वरदे तारक संजीवनी, जय देवी जय देवी ॥धृ॥

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा
क्लेशापासुन सोडी तोडी भवपाशा
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥३॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी
सुरवर ईश्वरदे तारक संजीवनी, जय देवी जय देवी ॥धृ॥


मित्रोंना तुम्हाला Durge Durgat Bhari Lyrics | दुर्गा देवीची आरती जर आवडली असेल तर आम्हाला Facebook वर share नक्की करा.

या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here