मारुतीची आरती | Maruti Aarti | Hanuman Aarti

Maruti Aarti
Print Friendly, PDF & Email
Rate this post

ह्या पोस्ट मध्ये तुमच्यासाठी Maruti Aarti – मारुतीची आरती online वाचायला प्रस्तुत करत आहे.

Maruti Aarti | Hanuman Aarti | मारुतीची आरती

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ।
गडबडिलें ब्रह्मांड धाकें त्रिभुवनीं ।
सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ॥१॥

जय देव जय देव जय हनुमंता ।
तुमचे नि प्रसादें न भीं कृतांता ॥

दुमदुमिलीं पाताळें उठिला प्रतिशब्द ।
थरथरला धरणीधर मानीला खेद ।
कडकडिले पर्वत उड्डगण उच्छेद ।
रामीं रामदासा शक्तीचा बोध ॥२॥

जय देव जय देव जय हनुमंता ।
तुमचे नि प्रसादें न भीं कृतांता ॥


आशा करत आहे की तुम्हाला Maruti Aarti – मारुतीची आरती आवडली असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि Facebook वर आमचा blog नक्की शेयर करा.

वरील पोस्ट बद्ल तुमचे काही विचार असतील तर आम्हाला comment करून जरूर कळवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here