नागद्वारची आरती | Nagdwara Aarti

Nagdwara Aarti
Print Friendly, PDF & Email
Rate this post

ह्या पोस्ट मध्ये तुमच्यासाठी नागद्वारची आरती | Nagdwara Aarti online वाचायला प्रस्तुत करत आहे.

Nagdwara Aarti | नागद्वारची आरती

आरती नागद्वारा, शेषशाई अवतारा,
सद्भावे ओवाळितो, पावे दिगंबर द्वारा ।
आरती नागद्वारा ।।धृ ।।

मेरुच्या शिखरी जडले, सिंहासन भारी ।
त्यावर बैसुनिया, सृष्टी रचली या सारी ।।१।।
आरती नागद्वारा……

श्रीराम अवतारी, बंधू लक्ष्मण होशी ।
पाळली राम आज्ञा, पुर्ण कार्य तू करशी ।।२।।
आरती नागद्वारा……

श्रीकृष्ण अवतारी, ज्येष्ठ बंधू बळीराम ।
प्रताप थोर होतो, जगी मिळविले नाव ।।३।।
आरती नागद्वारा……

श्रावण महिन्यात, दिवस नागपंचमी रात्र ।
आनंद थोर होतो देवा तुझ्या मंडपात ।।४।।
आरती नागद्वारा……

शेष सिंधु सागरात, शेषसाई अनंत ।
तेथे तुम्ही नांदता हो, ज्याला म्हणतात लक्ष्मीकांत ।।५।।
आरती नागद्वारा……

कालीया नांव तुझे, घेता उतरले ओझे ।
स्मरण केली या हो, देवा सार्थक होई माझे।।६।।
आरती नागद्वारा……

देवा मी ज्ञान धरीले, दुःख माझे हरीले ।
हरीला सेवा केली, शंकर मजला पावले ।।७।।
आरती नागद्वारा……

वैशाख महिन्यात, दिवस नागपंचमी रात्र ।
आनंद थोर होतो देवा तुझ्या मंडपात ।।८।।
आरती नागद्वारा……

आज देव शेषराये, भक्ती तुझी पुर्ण होय ।
नवखंड पृथ्वीशी, देवा भरुनी आला आहे ।।९।।
आरती नागद्वारा……

पाचतत्व पंच ज्योती, ओवळीले नागनाथा ।
भक्तजन आरत्या गावी, जागा चारणापाशी द्यावी ।।१०।।
आरती नागद्वारा……

आरती नागद्वारा, गणेश गायन करी ।
नित्य नेम महाभारी, सर्वदिन सेवा करी ।।११।।
आरती नागद्वारा……


मित्रोंनो तुम्हाला Nagdwara Aarti | नागद्वारची आरती जर आवडली असेल तर आम्हाला Facebook वर share नक्की करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here