श्री गुरुदत्ताची आरती | Shree Gurudatta Aarti

Shree Gurudatta Aarti
Print Friendly, PDF & Email
Rate this post

श्री गुरुदत्ताची आरती | Shree Gurudatta Aarti: ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला हा स्तोत्र online वाचायला मिळेल.

ह्या page ला bookmark करून ठेवा, म्हणजे तुम्हाला Ganga Mata Stotra easily ऍक्सेस करता होईल.

Shree Gurudatta Aarti | श्री गुरुदत्ताची आरती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रेलोक्य राणा ।।
नेती नेती शब्द न ये अनुमाना ।
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ।। १ ।।

जय देव जयदेव जय श्री गुरुदत्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता । जय देव जय देव ।।

सबाह्य अभ्यंतरीं तू एक दत्त ।
अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।।
परा ही परतली तेथे कैंचा हा हेत ।
जन्मरमरण्याचा पुरलासे अंत ।। २ ।।

जय देव जयदेव जय श्री गुरुदत्ता।
आरती ओवाळिता हरली भवचिंता । जय देव जय देव ।।

दत्त येऊनिया उभा ठाकला ।
सद्भावे साष्टांग प्रणिपात केला ।।
प्रसन्न होऊनिया आशीर्वाद दिधला ।
जन्ममरण्याचा फेरा चुकविला ।। ३ ।।

जय देव जयदेव जय श्री गुरुदत्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता । जय देव जय देव ।।

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ।
हारपले मन झाले उन्मन ।।
मीतूंपणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनीं श्री दत्त ध्यान ।। ४ ।।

जय देव जयदेव जय श्री गुरुदत्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता । जय देव जय देव ।।


आशा करतो की तुम्हाला Shree Gurudatta Aarti | श्री गुरुदत्ताची आरती आवडला असेल, जर होय तर कृपया खाली comment करून तुमचे विचार शेअर करा, आणि ह्या पेज ला तुमच्या मित्रां बरोबर नक्की share करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here