श्री रामाची आरती | Shree Ram Aarti

Shree Ram Aarti
Print Friendly, PDF & Email
2/5 - (1 vote)

श्री रामाची आरती | Shree Ram Aarti ही एक सुंदर आरती आहे.

कृपया हा पेज बुकमार्क करून ठेवा म्हणजे तुम्हाला दर वेळेला शोधत बसावे लागणार नाही.

Shree Ram Aarti | श्री रामाची आरती

उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनी ।
लिंगदेह-लंकापुरि विध्वंसूनी ॥
कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।
देह-अहंभाव रावण निवटोनी ॥ १ ॥

जय देव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थे आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ॥ ध्रु ॥

प्रथम सीताशोधा हनुमंत गेला ।
लंका दहन करुनी अखया मारिला ॥
मारिला जंबूमाळी बुवनीं त्राहाटीला ।
आनंदाची गुढी घेउनियां अला ॥ २ ॥

जय देव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थे आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ॥

निजबळें निजशक्ति सोडविली सीता ।
म्हणुनी येणें झालें आयोध्यें रघुनाथा ॥
आनंदें वोसंडे वैराग्य भरता ।
आरति घेउनि आली कौसल्या माता ॥ ३ ॥

जय देव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थे आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ॥

अनाहत ध्वनि गर्जति अपार ।
अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ॥
अयोध्येसी आले दशरथकुमार ।
नगरीं होत आहे आनंद थोर ॥ ४ ॥

जय देव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थे आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ॥

सहज सिंहासनीं राजा रघुवीर ।
सोSहंभावें तया पूजा उपचार ।
सहजांची आरती वाद्यांचा गजर ।
माधवदासा स्वामी आठव ना विसर ॥५॥

जय देव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थे आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ॥


कसा वाटली Shree Ram Aarti | श्री रामाची आरती खालती comment करुन नक्की कळवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here