Durga Devi Aarti – दुर्गा देवीची आरती ही सनातन भारतीय संस्कृतीतील प्रसिद्ध आरती आहे. या आरतीमध्ये संगीतमय शब्दांनी मातृभक्ती व्यक्त करण्याचा सुंदर प्रयास केला जातो.
दुर्गा देवीची आरती | Durga Devi Aarti in Marathi
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ।
वारी वारी जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट निवारी ।।
जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी ।
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी ।।
त्रिभुवन-भुवनी पहाता तुजऐसी नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलवे काही ।
साही विवाद करिता पडले प्रवाही ।
ते तू भक्तालागी पावसी लवलाही ।।
जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी ।
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी ।।
प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशांपासुनी सोडवी तोडी भवपाशा ।
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा ।
नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा ।।
जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी ।
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी ।।
मित्रोंना तुम्हाला Durga Devi Aarti – दुर्गा देवीची आरती जर आवडली असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा.
या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.