कशे आहेत मित्रांनो, श्री हनुमान आरती (Hanuman Aarti in Marathi) म्हणा आणि हनुमानाला प्रसन्न करून आपले जीवन रूपांतरण करा.
ह्या blog मध्ये श्री हनुमान आरती – Hanuman Aarti in Marathi प्रस्तुत करत आहे.
श्री हनुमान आरती | Hanuman Aarti in Marathi
॥ श्री हनुमान आरती ॥
सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ।
कडाडिलें ब्रह्मांड धोका त्रिभुवनीं ।
सुरवर, नर, निशाचर त्या झाल्या पळणी ।।१।।
जय देव जय देव जय जय हनुमंता ।
तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता ।। धृ० ।।
दुमदुमिले पाताळ उठला पडशब्द ।
धगधगिला धरणीधर मानिला खेद ।
कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद ।
रामीं रामदासा शक्तीचा शोध ।।२।।
मारुतीची आरती २
जय देवा हनुमंता । जय अंजनीसुता ॥
ॐ नमो देवदेवा । राया रामाच्या दूता ॥
आरती ओवाळीन । ब्रह्मचारी पवित्रा ॥ध्रु०॥
वानरूपधारी । ज्याची अंजनी माता ।
हिंडता वनांतरी । भेटी झाली रघुनाथा ॥
धन्य तो रामभक्त । ज्याने मांडिली कथा ॥ जय० ॥१॥
सीतेच्या शोधासाठीं । रामे दिधली आज्ञा ॥
उल्लंधुनी समुद्रतीर । गेला लंकेच्या भुवना ॥
शोधूनी अशोकवना । मुद्रा टाकिली खुणा ॥ जय० ॥२॥
सीतेसी दंडवत । दोन्ही कर जोडून ॥
वन हे विध्वंसिले । मारिला अखया दारुण ।
परतोनी लंकेवरी । तवं केले दहन ॥ जय० ॥३॥
निजबळे इंद्रजित । होम करी आपण ॥
तोही त्वां विध्वसिला । लघुशंका करून ॥
देखोनी पळताती । महाभूते दारुण ॥ जय० ॥४॥
राम हो लक्षुमण । जरी पाताळी नेले ॥
तयांच्या शुद्धीसाठी । जळी प्रवेश केले ॥
अहिरावण महिरावण । क्षणामाजि मर्दिले ॥ जय० ॥५॥
देउनी भुभुःकार । नरलोक आटीले ॥
दीनानाथ माहेरा । त्वां स्वामिसी सोडविले ॥
घेऊनी स्वामी खांदी । अयोध्येसी आणिले ॥ जय० ॥६॥
हनुमंत नाम तुझे । किती वर्णू दातारा ॥
अससी सर्वांठायी । हारोहारी अम्बरा ॥
एका जनार्दनी । मुक्त झाले संसारा ॥ जय० ॥७॥
आशा आहे की तुम्हाला Hanuman Aarti Marathi – श्री हनुमान आरती आवडली असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि Facebook वर आमचा blog नक्की शेयर करा.
वरील पोस्ट बदल तुमचे काही विचार असतील तर आम्हाला comment करून जरूर कळवा.