श्री महालक्ष्मीची आरती | Mahalaxmi Aarti Lyrics in Marathi (2024 Update)

Mahalaxmi Aarti Lyrics in Marathi
Print Friendly, PDF & Email
5/5 - (1 vote)

नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्ट मध्ये आपण एक खूपच सुप्रसिद्ध श्री महालक्ष्मीची आरती – Mahalaxmi Aarti Lyrics in Marathi बघणार आहोत.

श्री महालक्ष्मी ही संपत्ती, समृद्धी आणि भाग्याची देवी आहे. ह्या आरतीचा पाठ करून तुम्ही तुमच्या जीवनात धन आकर्षित करू शकता.

श्री महालक्ष्मीची आरती | Mahalaxmi Aarti Lyrics in Marathi

॥ श्री महालक्ष्मीची आरती ॥

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।
वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥

करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता।
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता।
कमलाकारें जठरी जन्मविला धाता।
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां ॥१॥

मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं।
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी।
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी।
शशिकरवदना राजस मदनाची जननी ॥२॥

तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी।
गायत्री निजबीजा निगमागम सारी।
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी ॥३॥

अमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं।
मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं।
वारी मायापटल प्रणमत परिवारी।
हें रुप चिद्रूप दावी निर्धारी ॥४॥

चतुराननें कुश्चित कर्मांच्या ओळी।
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी।
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥५॥

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।
वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥


आम्ही आशा करतो की तुम्हाला Mahalaxmi Aarti Lyrics in Marathi – श्री महालक्ष्मीची आरती आवडली असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि Facebook वर शेयर करा.

वरील पोस्ट बदल तुमचे काही विचार असतील तर आम्हाला जरूर कळवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here