ह्या blog मध्ये नाना परिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें आरती | Nana Parimala Durva in Marathi प्रस्तुत करत आहे.
Nana Parimala Durva in Marathi | नाना परिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें आरती
नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें ।
लाडू मोद्क अन्ने परिपूरित पात्रें ।।
ऎसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे ।
अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें ।। १ ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती ।। धृ. ।।
तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ।
त्यांची सकलही पापे विघ्नेंही हरती ।।
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।
सर्वहि पावती अंती भवसागर तरती ।। २ ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती ।। धृ. ।।
शरणांगत सर्वस्वें भजती तव चरणी ।
कीर्ती तयांची राहे जोवर शशितरणि ।।
त्रैलोक्यी ते विजयी अदभूत हे करणी ।
गोसावीनंदन रत नामस्मरणी ।। ३ ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती ।। धृ. ।।
आम्ही आशा करतो की तुम्हाला Nana Parimala Durva in Marathi | नाना परिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें आरती आवडली असेल, जर होय तर कृपया खाली comment करून तुमचे विचार शेअर करा.
तुम्ही आमची वेबसाइट विजिट केल्याबद्दल धन्यवाद.