ह्या लेखात Shri Swami Samarth Kakad Aarti | श्री स्वामी समर्थ काकड आरती तुमच्यासाठी प्रस्तुत करत आहे.
ही आरती खूपच गोड आरती आहे आणि ही आरती म्हणून तुम्ही श्री स्वामी समर्थची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त करू शकता.
Shri Swami Samarth Kakad Aarti | श्री स्वामी समर्थ काकड आरती
ओवाळीतो काकड आरती स्वामी समर्थ तुजप्रती । स्वामी समर्थ तुजप्रती।
चरण दावी जगत्पते । स्मरतो तुझी अभिमूर्ती ॥धृ॥
भक्तजन येऊनिया दारी उभे स्वामीराया। दारी उभे स्वामीराया।
चरण तुझे पहावया। तिष्ठती अती प्रीती ॥१॥
ओवाळीतो काकड आरती स्वामी समर्थ तुजप्रती । स्वामी समर्थ तुजप्रती।
चरण दावी जगत्पते । स्मरतो तुझी अभिमूर्ती ॥धृ॥
भक्तांच्या कैवारी समर्था समर्थ तु निरधारी। समर्था समर्थ तु निरधारी।
भेट घेऊन चरणावरी। गातो आम्ही तुझी स्तुती ॥२॥
ओवाळीतो काकड आरती स्वामी समर्थ तुजप्रती । स्वामी समर्थ तुजप्रती।
चरण दावी जगत्पते । स्मरतो तुझी अभिमूर्ती ॥धृ॥
पूर्णब्रम्ह देवाधिदेवा निरंजनी तुझा ठावा। निरंजनी तुझा ठावा।
भक्तासाठी देहभाव। तारिसी तु विश्वपती ॥३॥
ओवाळीतो काकड आरती स्वामी समर्थ तुजप्रती । स्वामी समर्थ तुजप्रती।
चरण दावी जगत्पते । स्मरतो तुझी अभिमूर्ती ॥धृ॥
स्वामी तुची कृपाघन ऊठुन देई दर्शन। ऊठुन देई दर्शन।
स्वामीदास चरण वंदी। मागतसे भावभक्ती ॥४॥
ओवाळीतो काकड आरती स्वामी समर्थ तुजप्रती । स्वामी समर्थ तुजप्रती।
चरण दावी जगत्पते । स्मरतो तुझी अभिमूर्ती ॥धृ॥
आशा करत आहे की तुम्हाला Swami Samarth Kakad Aarti | श्री स्वामी समर्थ काकड आरती आवडली असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि Facebook वर आमचा blog नक्की शेयर करा.
वरील पोस्ट बदल तुमचे काही विचार असतील तर आम्हाला comment करून जरूर कळवा.