Sundar Te Dhyan Ubhe Vitevari in Marathi – सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हे संत तुकारामांनी भगवान विठोबाच्या स्तुतीसाठी केलेले लोकप्रिय कीर्तन आहे.
Sundar Te Dhyan Ubhe Vitevari in Marathi | सुंदर तें ध्यान उभे विटेवरी
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवोनियां ॥१॥
तुळसी हार गळां कांसे पीताम्बर ।
आवडे निरंतर तेंचि रूप ॥२॥
मकरकुंडलें तळपती श्रवणीं ।
कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥३॥
तुका ह्मणे माझें हेंचि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडींने ॥४॥