नमस्कार मित्रांनो, कशे आहेत, ह्या लेखात विठ्ठलाची आरती – Vitthalachi Aarti in Marathi Lyrics प्रस्तुत करत आहे.
श्री हरी विठ्ठल हे हिंदू देवाचे नाव आहे जे विष्णू किंवा कृष्णाचे अवतार मानले जाते.
विठ्ठलाला साधारणपणे एका तरुण मुलाच्या रूपात चित्रित केले जाते जो विटेवर हात पसरून उभा असतो आणि कधी कधी त्याची पत्नी रखुमाई देखील बाजूला उभी असते.
विठ्ठलाची आरती | Shri Vitthalachi Aarti in Marathi Lyrics
॥ विठ्ठलाची आरती ॥
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
वामाङ्गी रखुमाईदिसे दिव्य शोभा ।
पुण्डलिकाचे भेटि परब्रह्म आले गा
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ०॥
तुळसीमाळा गळा कर ठेऊनी कटी
कासे पीताम्बर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी
गरुड हनुमन्त पुढे उभे राहती ॥२॥
धन्य वेणूनाद अणुक्षेत्रपाळा
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा
ओवाळिती राजा विठोबा सावळा ॥३॥
ओवाळू आरत्या कुरवण्ड्या येती
चन्द्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिण्ड्या पताका वैष्णव नाचती
पण्ढरीचा महिमा वर्णावा किती ॥४॥
आशा आहे की तुम्हाला Vitthalachi Aarti in Marathi – विठ्ठलाची आरती आवडली असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि Facebook वर आमचा blog नक्की शेयर करा.
वरील पोस्ट बदल तुमचे काही विचार असतील तर आम्हाला comment करून जरूर कळवा.