नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्ट मध्ये आपण माहुरगडावरी देवीची आरती | Mahur gadavari Devichi Aarti बघणार आहोत.
माहुरगडावरी देवीची आरती | Mahur gadavari Devichi Aarti
माहुरगडावरी माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास ॥धृ.॥
पिवळे पातळ ग पिवळे पातळ बुट्टेदार, अंगी काचोळी हिरवीगार
पितांबराची ग पितांबराची खोवून कास, भक्त येतील दर्शनास ॥१॥
बिंदीबिजवरा ग बिंदीबिजवरा भाळी शोभे, कर्णि बाळ्यान वेलझुबे
इच्या नथेला ग इच्या नथेला हिरवा घोस, भक्त येतील दर्शनास ॥२॥
सरी ठुसीन ग सरी ठुसीन मोहनमाळ, जोडवे मासोळ्य़ा पैंजन चाळ
पट्टा सोन्याचा ग पट्टा सोन्याचा कमरेला, हाती हिरवा चुडा शोभला ॥३॥
जाईजुईची ग जाईजुईची आणली फुले, भक्त गुंफीती हारतुरे
हार घालिते ग हार घालिते अंबे तुला, भक्त येतील दर्शनास ॥४॥
इला बसायला ग इला बसायला चंदनपाट, इला जेवाया चांदीचे ताट
पुरणपोळी ग पुरणपोळी भोजनाला, मुखी तांबुल देते तुला
खणनारळाची खणनारळाची ओटी तुला, भक्त येतील दर्शनास ॥५॥
माझ्या मनीची मानसपुजा, प्रेमे अर्पिली अष्टभुजा
मनोभावाने ग मनोभावाने पुजीते तुला, भक्त येतील दर्शनास ॥६॥
आम्ही आशा करतो की तुम्हाला Mahur gadavari Devichi Aarti आवडली असेल, जर होय तर कृपया खाली comment करून तुमचे विचार शेअर करा.