श्री स्वामी समर्थ आरती | Aarti Ovaloo Charani Theuniya Matha – Swami Samarth Aarti

Aarti Ovaloo Charani Theuniya Matha Swami Samarth
Print Friendly, PDF & Email
Rate this post

कशे आहेत मित्रांनो, आज तुमच्यासाठी मन प्रसन्न करणारी अशी आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा – श्री स्वामी समर्थ आरती | Aarti Ovaloo Charani Theuniya Matha – Swami Samarth Aarati सादर करत आहे.

Aarti Ovaloo Charani Theuniya Matha-Swami Samarth Aarati | आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा

जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था।
आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ।।धृ।।

छेलि खेडे ग्रामी तु अवतरलासी, राया अवतरलासी।
जग्दउध्दारासाठी राया तु फिरसी।
भक्तवत्सल खरा तु एक होसी, राया एक होसी।
म्हणुनी शरण आलो तव चरणासी।

जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था।
आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ।।धृ।।

त्रैगुण-परब्रम्ह तुझा अवतार, तुझा अवतार।
त्याची काय वर्णु लिला पामर।
शेशादिक क्षीणले नलगे त्या पार, नलगे त्या पार।
तेथे जडमुढ कैसा करु मी विस्तार।

जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था।
आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ।।धृ।।

देवाधिदेवा तु स्वामी राया, तु स्वामी राया।
निरजर मुनीजन ध्याती भावे तव पाया।
तुझसी अर्पण केली आपुली ही काया, आपुली ही काया।
शरणागता तारी तु स्वामी राया।

जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था।
आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ।।धृ।।

अघटीत लिला करुनी जडमुढ उध्दारिले, जडमुढ उध्दारिले।
किर्ती एकूनी कानी चरणी मी लोळे।
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले, मज हे अनुभवले।
तुझ्या सुता नलगे चरणा वेगळे।

जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था।
आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ।।धृ।।


कसा वाटली आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा – श्री स्वामी समर्थ आरती | Aarti Ovaloo Charani Theuniya Matha – Swami Samarth Aarti, आम्हाला खालती Comment करून तुमचे अनुभव नक्की कळवा.

या पोस्ट मध्ये तुम्हाला काही Suggest करायचे असेल तर मोकळ्या मानाने आम्हाला Share करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here