श्री दत्ताची आरती (Datta Aarti in Marathi) ही आरती म्हणा आणि श्री दत्त गुरूंचे आवाहन करून आपल्या जीवनात गुरूंचे मार्गदर्शन प्राप्त करून घ्या.
ह्या लेखात श्री दत्ताची आरती – Datta Aarti in Marathi प्रस्तुत करत आहे.
श्री दत्ताची आरती | Shri Datta Aarti in Marathi
॥ श्री दत्ताची आरती ॥
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना ॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥
दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥
आशा करतो की तुम्हाला Datta Aarti Marathi – श्री दत्ताची आरती आवडली असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि Facebook वर आमचा blog नक्की शेयर करा.
वरील पोस्ट बदल तुमचे काही विचार असतील तर आम्हाला comment करून जरूर कळवा.