श्री शंकराची आरती | Shankarachi Aarti Lyrics in Marathi (2024 Update)

Shankarachi Aarti
Print Friendly, PDF & Email
Rate this post

श्री शंकराची आरती ही संपूर्ण विश्वात ओळखली जाणारी एक सुप्रसिद्ध आरती आहे. या आरतीने भक्तांना शंकराच्या कृपेचा आशीर्वाद प्राप्त होतो.

भक्ति भावाने शंकराची आरती करुनं जीवनामध्ये बळ अणि शक्तिचा संचार होतो अणि भक्ताला एक नविन तरंगेची अनुभूती होते.

श्री शंकराची आरती | Shankarachi Aarti Lyrics in Marathi

॥ श्री शंकराची आरती ॥

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा,
वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा
लावण्य सुंदर मस्तकी बाळा,
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥१॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा,
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा जय देव जय देव ॥धृ॥

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा,
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा
विभुतीचे उधळण शितकंठ नीळा,
ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा ॥२॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा,
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा जय देव जय देव ॥धृ॥

देवी दैत्यी सागरमंथन पै केले,
त्यामाजी अवचित हळहळ जे उठले
ते त्वा असुरपणे प्राशन केले,
नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥३॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा,
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा जय देव जय देव ॥धृ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी,
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी,
रघुकुलटिळक रामदासा अंतरी ॥४॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा,
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा जय देव जय देव ॥धृ॥


आम्ही आशा करतो की तुम्हाला Shankarachi Aarti – श्री शंकराची आरती आवडली असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here