पांडुरंगाची आरती | येई हो विठ्ठले माझे माउली ये-पांडुरंग आरती | Pandurangachi Aarti

Pandurangachi Aarti
Print Friendly, PDF & Email
Rate this post

पांडुरंगाची आरती | Pandurangachi Aarti: ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला हा स्तोत्र online वाचायला मिळेल.

ह्या page ला bookmark करून ठेवा, म्हणजे तुम्हाला Pandurangachi Aarti easily ऍक्सेस करता होईल.

Pandurangachi Aarti | पांडुरंगाची आरती

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।।

निढळावरी कर…
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहें
ठेवुनी वाट मी पाहें ।

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।।

आलिया गेलिया हातीं धाडी निरोप
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप
पंढरपुरी आहे…
पंढरपुरी आहे माझा मायबाप
हो माझा मायबाप । १ ।

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।।

पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला
गरुडावरी बैसोनि…
गरुडावरी बैसोनि माझा कैवारी आला
हो माझा कैवारी आला । २।

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।।

विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी
विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी
विष्णुदास नामा…
विष्णुदास नामा जीवे भावें ओवाळी
हो जीवे भावें ओवाळी । ३।

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।।

असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां
असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां
कृपादृष्टी पाहें…
कृपादृष्टी पाहें माझ्या पंढरी राया
हो माझ्या पंढरी राया । ४।

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।।


मित्रोंनो तुम्हाला Pandurangachi Aarti | पांडुरंगाची आरती जर आवडली असेल तर आम्हाला Facebook वर share नक्की करा.

या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख त्वरितच अपडेट करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here