साईबाबाची आरती | Sai Baba Aarti in Marathi

Sai Baba Aarti in Marathi
Print Friendly, PDF & Email
Rate this post

ह्या blog मध्ये Sai Baba Aarti in Marathi – साईबाबाची आरती प्रस्तुत करत आहे.

Sai Baba Aarti in Marathi | साईबाबाची आरती

आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा।
चरणरजातली । द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा ।। आ०।।ध्रु ०।।
जाळुनियां अनंग। स्वस्वरूपी राहेदंग ।
मुमुक्षूजनां दावी । निज डोळा श्रीरंग ।। आ०।। १ ।।
जयामनी जैसा भाव । तया तैसा अनुभव ।
दाविसी दयाघना । ऐसी तुझीही माव ।। आ०।। २ ।।
तुमचे नाम ध्याता । हरे संस्कृती व्यथा ।
अगाध तव करणी । मार्ग दाविसी अनाथा ।। आ०।। ३ ।।
कलियुगी अवतार । सगुण परब्रह्मः साचार ।
अवतीर्ण झालासे । स्वामी दत्त दिगंबर ।। द०।। आ०।। ४ ।।
आठा दिवसा गुरुवारी । भक्त करिती वारी ।
प्रभुपद पहावया । भवभय निवारी ।। आ०।। ५ ।।
माझा निजद्रव्यठेवा । तव चरणरज सेवा ।
मागणे हेचि आता । तुम्हा देवाधिदेवा ।। आ०।। ६ ।।
इच्छित दिन चातक। निर्मल तोय निजसुख ।
पाजावे माधवा या । सांभाळ आपुली भाक ।। आ०।। ७ ।।


मित्रोंना तुम्हाला साईबाबाची आरती | Sai Baba Aarti in Marathi जर आवडली असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा.

तुम्हाला आमची web site आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना share नक्की करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here