श्री तुळशीची आरती | Shree Tulasi Aarti

Shree Tulasi Aarti
Print Friendly, PDF & Email
5/5 - (1 vote)

नमस्कार मित्रांनो, ह्या blog पोस्ट मध्ये आपण श्री तुळशीची आरती | Shree Tulasi Aarti बघणार आहोत.

Shree Tulasi Aarti | श्री तुळशीची आरती

जय देवी जय देवी जय माये तुळशी ।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळसी ॥ ध्रु० ॥

ब्रह्मा केवळ मूळीं मध्यें तो शौरी ।
अग्रीं शंकर तीर्थें शाखापरिवारीं ।
सेवा करिती भावें सकळहि नरनारी ।
दर्शनमात्रें पापें हरती निर्धारीं ॥१॥

जय देवी जय देवी जय माये तुळशी ।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळसी ॥ ध्रु० ॥

शीतल छाया भूतलव्यापक तूं कैसी ।
मंजिरिची बहु आवड कमलारमणासी ।
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी ।
विशेष महिमा तूझ शुभ कार्तिकमासीं ॥२॥

जय देवी जय देवी जय माये तुळशी ।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळसी ॥ ध्रु० ॥

अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।
तुझे पूजनकालीं जो हें उच्चारी ।
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी ।
गोसावीसुत विनवी मजला तूं तारी ॥३॥

जय देवी जय देवी जय माये तुळशी ।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळसी ॥ ध्रु० ॥


मित्रोंनो तुम्हाला Shree Tulasi Aarti | श्री तुळशीची आरती जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर share नक्की करा.

या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख त्वरितच अपडेट करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here